लोंजाई माता मंदिर सोनेवाडी, निफाड ,
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका निफाड म्हणजे नी पहाड ,ज्या ठिकाणी डोंगर,पहाड नाही असा तालुका ,परंतु हे शब्दशः खरे नाही कारण निफडच्या पूर्वेला 9 किमी अंतरावर एक छोटासा डोंगर आहे त्याला लोंजाई असे म्हणतात,लोंजाई माता या डोंगरावर वास करते म्हणून ह्या डोंगराला लोंजाई चा डोंगर असे म्हणतात,या मंदिरात दर वर्षी नवरात्र उताव हा धूम धडाक्यात साजरा होतो,या मंदिराच्या परिसरात पाणी पिण्यासाठी कुंड असून साधारण वर्षभर या ठिकाणी पिण्यायोग्य पाणी उपलब्ध असत.तसेच या ठिकाणच्या सभोवताली असणाऱ्या रहिवासी यांच्या म्हणण्यानुसार या डोंगरावरून एक भुयारी मार्ग बोकडदरा या ठिकाणी जाऊन मिळतो आणि यातून एक व्यक्ती घोड्यावर स्वार होऊन जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोंजाई देवी मंदिराला भेट दिल्याची माहिती येथील जवळपास च्या गावातील गावकरी सांगतात. या डोंगराच्या पायथ्याशी वारकरी संप्रदायाची पताका आयुष्यभर मिरवणारे व कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे वै.ह.भ.प.नानामहाराज वडणेरे यांचा आश्रम आहे आणि त्यांच्याच प्रयत्नातून लोंजाई डोंगरावर लोंजाई मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाले ला आहे. डोंगराच्या पाय...