रामशेज किल्ला नाशिक
खूप दिवसांपासून रामशेज किल्ल्याला भेट द्यावि अशी मनात इच्छा होती, परंतु काही कारणांमुळे ही भेट मागे राहिली, शेवटी योग जुळवून आलाच आणि मी व माझामित्र प्रशांत आम्ही 3 सप्टेंबर 2017 ही तारीख नक्की केली.
त्यानुसार बरोबर सकाळी लवकर उठून (६वाजता)आम्ही नाशिक कडे प्रयाण केले व अर्ध्या तासाने आम्ही रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो, आणि किल्ला चठायला सुरवात केली ,पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे किल्ला हिरवागार दिसत होता थोडासा चिखल पण वाटेत झालेला असल्याने वाट ही स्लीपरी झालेली होती आम्ही हळुवार व काळजीपूर्वक डोंगरावर चठाई करत होतो.
तसा हा ट्रेक सोपा आहे परंतु पावसाळा सुरू असल्याने व सकाळी दाट धुके व दवबिंदू मूळे वाट ही काहीशी अवघड वाटत होती ,काही ठिकाणी वाट ही अरुंद असल्याने डोंगर चढण्यात एक प्रकारचा थ्रिल अनुभवायला मिळत होता ,साधारण पाऊण तासात आम्ही किल्ल्यावर पोहोचलो होतो.
किल्ल्यावर पोहोचतास एक पेशवेकालीन मंदिर आहे, व एक गुफा आहे तिला रामागुफा असेही म्हणतात , थोडे वर गेल्यावर एकदारवाजा लागतो ,व आणखी थोडे पुठे गेल्यावले एकामागे एक सुंदर अशे तीन लहान दरवाजे आहे त्यातून पुठे गेल्यावर डोंगरात कोरलेली मानवनिर्मित गुहा आहे,येथून पुन्हा वरती आल्यानंतर उजव्या बाजूला एक पठार असून त्यावर कुठलाही प्रकारची पुरातन वस्तू दिसत नाही ,परंतु त्यांच्या विरुद्ध बाजूला पूर्वेकडे तटबंदी आहे आणि काही अंतरावर डोंगरात कोरलेल्या पायऱ्या व नंतर एक सुंदर कोरीव दरवाजा आहे ,बहुदा हे किल्ल्याचे प्रवेषद्वार असावे.या प्रवेशद्वाराजवळ पुन्हा काही पायऱ्या नजरेस पडतात आणि या पायर्यांच्या शेवटी फक्त एक माणूस जाऊ शकेल इतकेसे छिद्र आहे , याची मला उकल काही झाली नाही,
किल्ल्याचे पठार हे बरेच विस्तिर्ण आहे , या पठारावर हनुमानाचे मंदिर असून ते फारसे जुने वाटत नाही ,मात्र या ठिकाणी मंदिराचे पुरातन अवशेष म्हणजे जोते आढळुन आले .
रामशेज किल्याचा इतिहास हा फार संपन्न आहे .परंतु तो मी आत्ता नमूद करणार नाही.
किल्ल्यावर भटकून झाल्यावर आम्ही परतीचा मार्ग धरला व किल्ला उतरण्यास सुरवात केली आणि अर्ध्या तासात किल्ला उतरून खाली आलो ,
नाशिक पासून अवघ्या काही हाकेच्या अंतरावर असलेला हा किल्ला बघायला इतका उशीर केल्याचे दुःख झाले परंतु अप्रतिम ,सुंदर ,निसर्गाची हिरवीगार शाल पांघरूण बसलेला हा किल्ला बघून मनाला फार प्रसन्न वाटले ,
Comments
Post a Comment