स्वाईन फ्लू
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात स्वाईन फ्लू या आजाराने थैमान घातले आहे,आणि विशेषकरून नाशिक जिल्यात तर हे प्रमाण अधिक आहे, त्याच बरोबर नाशिक मध्ये डेंगू सदृश्य व प्रत्यक्षात डेंगू आजाराचे प्रमान हे वाढ लेले आहे.
स्वाईन फ्लू ,याला आमच्या म्हणजे डॉक्टरांच्या भाषेत H1N 1influenzaअसे म्हणतात, हा आजार वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे वातावरणातील तापमानातील विषमता म्हणजेच किमान व कमाल तापमान यातील साधारण डिड ते दुप्पट फरक ,अश्या प्रकारचे वातावरण हे या विषाणू च्या उद्रेकास कारणीभूत असते ,आणि सध्या आपल्या नाशिक चे वातावरण हे स्वाईन फ्लू हा आजार पसरण्यास पोषक झालेले आहे,त्याच बरोबर सणांचे दिवस हे चालू आहे, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी,यामुळे हा आजार झपाट्याने पसरत आहे,त्याचंबरोबर कामाचा ताण हाही शरीराची रोग प्रतिकारक क्षमता कमी करण्यास कारणीभूत आहे, या कारणांमुळे सध्या आपल्या नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लू हा आजार प्रचंड प्रमाणात फैलावत आहे.
स्वाईन फ्लू टाळण्यासाठी काय उपाय करावे जेणे करून या रोगाची लागण होऊ नये ,असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे,
स्वाईन फ्लू टाळण्यासाठी एक तर गर्दीच्या ठिकाणी करण नसताना जाणे टाळावे , मानसिक तणावापासून स्वतःला दूर ठेवावे , वेळेवर जेवण ,योग्य प्रमाणात झोप(6ते7तास),आणि सार्वजनिक ठिकाणी वावरतांना नाकाला रुमाल बांधावा ,आणि हे सर्व करूनही जर तुम्ही आजारी पडलास तर तात्काळ डॉक्टरांना भेटावे
स्वाईन फ्लू चे लक्षणे :तीव्र ताप, घशादुखी,खोकला,सर्दी,अंगदुखी,डोकेदुखी,ही काही प्रमुख लक्षणे आहेत .अश्या प्रकारची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ,ही लक्षने सामान्य फ्लू आजारात पण असतात ,आणि त्यामुळे स्वाईन फ्लू हा सामान्य फ्लू पेक्षा वेगळा कसा हे ओळखणे सर्वसामान्य माणसाला शक्य नाही .त्यामुळे वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते, व तो घ्यावा.
स्वाईन फ्लू मध्ये ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे ,त्या व्यक्तींसाठी हा आजार जीवघेणा होऊ शकतो,ऊ.गरोदर स्त्री, रक्तदाब, मधुमेह, दमा,एडस,सारखे आजार असलेले रुग्ण . या प्रकारच्या रुग्णांनी जास्त काळजी घेतली पाहिजे.
कुठल्याही प्रकारच्या तापात काय करावे त्यासाठी महत्वाच्या सूचना:
1,पाणी भरपूर प्यावे
2,भरपूर आराम करावा
3,वेळेवर जेवण करावे
4,कुटुंबातील इतर व्यक्तींपासून दूर राहावे (संसर्गजन्य रोग)जेणेकरून आपला आजार दुसऱ्याला होत नाही
आजारी पडून उपचार घेण्या पेक्षा, आजारी न पडणं हे कधीही चांगले, म्हणून तब्येतीची काळजी घ्या.आणि आनंदाने जगा.
Comments
Post a Comment