अरबी समुद्रात खरोखर सुनामी येणार का?
सध्या अरबी समुद्रात सुनामी येणार असल्याची बातमी ही व्हाट्स अप , वर फिरत आहे ,या बातमीची सत्यता तपासून बघण्यासाठी मी boomlive. Com ही webside चेक केली ,
तसेच सामना या मराठी वृत्तपत्राने याची सत्यता पडताळून पहिली आहे.या ठिकाणी मिळालेल्या माहितीच्या आधारे ,
बाबू कालयील या इसमाने पंतप्रधान यांना लिहिलेले पत्र पाठवले असून ही व्यक्ती B R research association for E S P या संस्थेच्या नावाने हे पत्र असून , यात केलेल्या दाव्याला कुठलाही शास्त्रीय कारण किंवा पुरावा जोडलेला नाही कारण ESP म्हणजे सध्या भाषेत six sence(extra sensory perception)म्हणतात , याचाच अर्थ हा दावा काही शास्त्रीय पद्धतीने केलेला नाही तर ह्या व्यक्ती च्या six sence नुसार हा दावा केलेला आहे.भूकंप व तत्सम नैसर्गिक आपत्ती विभागाचे शास्त्रज्ञांनी मात्र हा दावा फेटाळला आहे,
याचे मुख्य कारण म्हणजे या महाशयांनी घडणाऱ्या घटनेची साधारण वेळ व या मुळे प्रभावित होणार भाग याची खात्रीदायक माहिती दिलेली नसून मोघम 31 दिसेम्बर 2017च्या आधी अशी वेळ दिलेली आहे,तसेच या सारख्या घटनेचा अंदाज व्यक्त करण्यासाठी कुठलीही शास्त्रीय पध्द्त अजून विकसित झालेली नाही.
बाबू कालयील यांच्या म्हणण्यानुसार ह्या सुनामीचा फटका हा भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, चीन,जपान,थायलंड, व अरब देशांना बसनार आहे,तसेच या भूकंपाचे केंद्र हे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी आहे,म्हणजे अरबी समुद्रात आहे.जर अरबी समुद्रात सुनामी आणि भूकंप येणार असेल तर त्याचा परिणाम चीन,जपान,थायलंड, म्यानमार या देशांवर कसा होणार
कारण हे देश अरबी समुद्राच्या विरुद्ध दिशेला आहे.या महाशयाच्या म्हणण्यानुसार मग अर्धे जग हे धोक्यात आहे, त्यामुळे जोपर्यंत सरकार कडून कुठलीही अधिकृत धोक्यांची चेतावणी येत नाही तोपर्यंत अश्या बातम्यांना अफवा समजावे.
डॉ.सत्यजित निकम
ओझर मिग,नाशिक
Comments
Post a Comment