दिवाळीतच फटाके बंदी का ?
आज उच्च न्यायालयाने दिल्ली व NCR मध्ये फटाके विक्रीस बंदी घातली,(फोडण्यास?माहीत नाही).
फटाक्यांमुळे प्रदूषण होते खरे,पण फक्त दिवाळीच्याच फटाक्यांमुळे प्रदूषण होते हे मात्र अतीच झाले,मग हेच फटाके नवीन वर्षाच्या दिवशी ,ipl चे सामने संपल्यावर ,गणपती,ख्रिसमस, आणि महत्वाचे निवडणूक झाल्यावर वाजणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषण करत नाही का?
सर्वात जास्त प्रदूषण रोज वाहनांमुळे होते मग ते कायमचे बंद करण्याचे आदेश का कोर्ट नाही देत?, कारखान्यांमधून निघणाऱ्या धुराचे काय?
ठीक आहे फटाक्यांमुळे जर प्रदूषण होत असेल,आरोग्याला हानी होत असेल तर त्यावर बंदी घालायला काही हरकत नाही,पण मग फक्त दिवाळीच का? कायमची बंदी घाला व फटाके तयार करणारे कारखाने बंद करा.आणि नंतर रोजगाराच्या नावे ओरडू नाका,
दिवाळी हा दिव्यांचा सण, त्यामुळे दिवाळीत आम्हाला फटाक्यांपेक्षा दिवे महत्वाचे,फटाके नाही वाजविले म्हणून आमची दिवाळी साजरी होणार नाही असेही नाही,पण नियम हे सर्वांना समान असावे हीच आमची कोर्टाकडून अपेक्षा
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Comments
Post a Comment